कृषि सेवक मानधन वाढ कधी होणार? | राज्यातील कृषि सेवक, शिक्षण सेवक आणि आरोग्य सेवक मानधन वाढीच्या प्रतीक्षेत | krushi sevak mandhan vadh

 

कृषि सेवक मानधन वाढ कधी होणार? | राज्यातील कृषि सेवक, शिक्षण सेवक आणि आरोग्य सेवक मानधन वाढीच्या प्रतीक्षेत | krushi sevak mandhan vadh


कृषी विभागाच्या (Krishi Vibhag) विविध प्रकारच्या योजना जसे की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt) या अंतर्गत कृषी यांत्रिकरण उपाभियान, राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत विविध घटकांची अंमलबजावणी ही कृषी विभागातील महत्त्वाचा घटक असलेले कृषी सेवक म्हणजेच कृषी सहाय्यक हे शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचे काम करत असतात. कृषि सेवक/कृषि सहाय्यक (Krushi Sevak) हे गाव पातळीवरील कृषि विभागाचे नेतृत्व करत असतात तसेच कृषि विभागाच्या विविध योजना ह्या शेतकर्‍यांना बांधावर पोहचविण्याचे कार्य हे कृषि सेवक करत असतात.

 


महाराष्ट्र राज्य मध्ये 2000 पेक्षा जास्त कृषी सेवक (Krushi Sevak) हे सध्या कार्यरत असून त्यांना जेमतेम दरमहा 6000 रुपयांवर काम करावे लागत आहे. राज्यात कार्यरत कृषी सेवकांच्या मानधन वाढीची मागणी ही अनेक वर्षांपासून रखडलेली आहे गेल्या काही काळात मानधनवाढीच्या दृष्टीने बैठकांचे सत्र पार पडली तसेच त्यासाठी मंजुरीही मिळाल्याचे वृत्तही इतर माध्यमांमध्ये झळकल्याने राज्यातील सर्व कृषी सेवक हे आनंदी झाले होते मात्र याबाबत अद्याप पर्यंत कुठलाही आदेश निघाला नसल्याने राज्यातील सर्व कृषी सेवक हे सध्या मानधन वाढीचे प्रतीक्षेत आहे.

 


कृषी विभागामध्ये नोकरीला रुजू झाल्यानंतर कृषी सेवकांना (Krushi Sevak) पहिले तीन वर्ष दरमहा सहा हजार (रु. 6000/-) निश्चित वेतनावर काम करावे लागते या निश्चित वेतनातून त्यांचा घर खर्चही भागवणे कठीण असते त्यामुळे मानधन वाढीचे मागणी ही शासनाकडे गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. 

 


कृषी सेवक (Krushi Sevak) यांच्या मानधन वाढी संदर्भात ऑक्टोबर मध्ये बैठकी ही झाली आणि या बैठकीमध्ये कृषी सेवक यांची रुपये 6000/- वरून 16,000/- रुपये मानधन वाढ करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने सादर केला परंतु अद्याप मानधन वाढीचा कोणताही शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाहीये.

 

तर, आता राज्यातील सर्व कृषी सेवक (Krushi Sevak), शिक्षण सेवक (Shikshan Sevak) आणि आरोग्य सेवक (Arogya Sevak) हे मानधन वाढीच्या प्रतीक्षेत आहेत…

 

 

Krushi Sevak mandhan vadh,krushi vibhag Maharashtra,shikshan sevak mandhan vadh,arogya sevak mandhan vadh, krushi sevak mandhan vadh


अधिक वाचा :

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 25/11/2022

* कांदाचाळ लाभार्थी निवड यादी

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 23 नोव्हेंबर 2022

* एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) कृषि यंत्रे सोडत यादी 17/11/2022

* पॅक हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022

Blogger द्वारे प्रायोजित.